उस्मानाबाद / प्रतिनिधी:

कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा दिना निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून शहरातील नागरिकांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शहरातील साहित्यिक,कवी लेखक,उत्तमराव लोकरेसर,कवी, युवराज नळे, साहित्यिक,कवी रविंद्रजी केसकर, साहित्यिक, कवी, डॉ रूपेश कुमार जावळे,कवी भिमा रसाळ,कवी, आंनद वीर,यांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी मनसेचे जिल्हाचे नेते दादा कांबळे,मनसे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटेसर, उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष निलेश जाधव, पृथ्वीराज शिंदे, विशाल कांबळे, यश सोनवणे, सौरभ लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top