उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी कोल्हापूर-पारसनाथ-धनबाद या रेल्वेची  उस्मानाबाद मार्गे पहिली फेरी शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी सुरु झाली. उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर  सकल जैन समाज उस्मानाबाद तर्फे या रेल्वेचे स्वागत पुष्पहार घालून व पेढे वाटून करण्यात आले.

यावेळी सकल जैन समाज अध्यक्ष उल्हास चाकवते,सचिव अतुल अजमेरा,सुदेश फडकुले,राहुल दुरूगकर,अतुल कांबळे,प्रशांत येणेगूरे,अक्षय गांधी,बाहुबली नवले सर,सुनील वायकर,मनोज चाकवते,पप्पुसेठ पांडे,मिलिंद एखंडे उपस्थित होते.

या रेल्वेमुळे जैन धर्माचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजीला जाण्याची सोय झाली आहे. उस्मानाबाद,सोलापुर,बीड,औरंगाबाद, जालना व परिसरातील जैन भाविकांची सोय झाली आहे.त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जैन धर्मियांचे एक सिद्धक्षेत्र कुंथलगिरी,धाराशिव जैन लेणी व चार आतिशय तीर्थक्षेत्र तेर,कासार आष्टा,काटी सावरगाव,नाईचाकूर असल्यामुळे उत्तर भारतीय जैन भाविकांची सुद्धा सोय झाली आहे.त्यामूळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनाला वेग येऊन उस्मानाबाद जिल्ह्याचे नावलौकिक वाढण्यास मदत होणार आहे. 

 
Top