उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 शहरातील सांजा रोड येथे शिवनेरी ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव शुक्रवारी (दि.१९) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे पूजन  पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा गगनभेदी घोषणांनी सांजा रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमून गेला होता. कार्यक्रमास पं.स. सदस्य श्री. नायकल, गावचे सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सुहास कदम, उस्मानाबाद तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रणजीत कदम, शिवराज्याभिषेक समितीचे विष्णू इंगळे, श्री. काकडे, शिवनेरी ऑटो रिक्षा संघटनेचे मार्गदर्शक देवा काकडे, अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष सत्यविजय मोहिते, सचिव बालाजी झोंबाडे, कोषाध्यक्ष बाळू सावंत, विशाल सूर्यवंशी, गफुर शेख, श्रीकांत कदम ,दत्ता कोळी, पिंटू सूर्यवंशी ,प्रदीप सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, अलीम शेख ,मंजूर शेख, समाधान चोपडे आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top