कळंब ( शिवप्रसाद बियाणी

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त सिटीजन फाउंडेशन आणि मोहेकर महाविद्यालय आयोजित खुल्या फुटबॉल स्पर्धेत जालनाचा संघ विजेता तर नेकनूरचा संघ उपविजेता ठरला आहे. अंतिम सामना जालना आणि नेकनूरच्या संघात झाला, ज्यामध्ये जालनाच्या संघाने 2-0 ने सामना जिंकला. 15 हजार 391 रुपये आणि सिटी कप देऊन विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

शिवजन्मोत्सवानिमित्त कळंबमध्ये पहिल्यांदाच 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान खुल्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये राज्यातून रायगड, अहमदनगर, जालना, बीड, बार्शी, उस्मानाबाद येथील 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. यात जालनाच्या संघाने बाजी मारून सिटी कप2021 वर आपलं नाव कोरले आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 11391 रुपये नेकनूरने तर  उस्मानाबादच्या संघाने 7381 रुपयांचे तिसरे पारितोषिक पटकावले. मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल मैदानावर तीन दिवस फुटबॉलचे सामने रंगले होते. तर तिसऱ्या दिवशी बुधवारी अंतिम सामना झाल्यास मैदानावरच बक्षिसाचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भारत गपाठ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तारेक मिर्झा, जलप्रतिष्ठानचे अजित काळे, अशोक चोंदे, संतोष घाटपरडे, संजीत मस्के, अरविंद शिंदे, डॉ. हनुमंत चौधरी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुनील पवार यांनी सिटीजन फाउंडेशनच्या नियोजनाचे कौतुक केले.  जालना आणि नेकनूरच्या संघाच्या कर्णधारानी देखील आपल्या मनोगतात स्पर्धा ठेऊन खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सिटीजन फाउंडेशनचे आभार मानले. सामन्यात पंच म्हणून भाऊसाहेब पाटील, अतुल मुंढे यांनी कामगिरी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजकुमार ढगे, कार्तिक इंगळे, अतुल मुंढे, आकाश कल्याणकार, शरद देशमुख, आशिष चंदनशिव, विजयकुमार ढगे, रामेश्वर दारशेवाढ, अस्लम शेख, आशुतोष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. 

 
Top