उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.  

मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांना गृह मंत्रालय, भारत सरकारचे सन- 2019 चे उत्कृष्ट अन्वेषनाचे ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहिर झाले होते. त्याचे प्रशस्ती पत्र-पदक या कार्यक्रमात मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. तसेच सन- 2019 चे बोधचिन्ह उस्मानाबाद पोलीस दलातील , पोउपनि- श्री कैलास लहाणे , सपोउपनि- श्री श्रीनिवास घुगे, पोहेकॉ- श्री प्रदिप जाधव , पोहेकॉ- श्री सुनिल काळेकर, पोहेकॉ- आत्माराम जाधव, पोहेकॉ- सुकूमार बनसोडे, पोना- रामेश्वर उंबरे यांना जाहिर झाले होते. ते प्रशस्ती पत्र-पदक या कार्यक्रमात मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.

त्यांच्यासह कोविड- 19 च्या लॉकडाऊन काळात उल्लेखनिय कामगीरी करणारे कोरोना योध्दे  पोनि- श्री सतिष चव्हाण, रापोनि- श्री शांताराम वाघमोडे, सपोनि- श्री संदिप मोदे, पोहेकॉ- श्री विष्णु केंडे, पोहेकॉ- श्री सुरेश चौधरी यांनाही मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रशस्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

 
Top