तुळजापूर/ प्रतिनिधी

नगरपालिकेतील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तुळजापूर नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

जुने शासकीय विश्रामगृह येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोलाई, जूने बसस्थानक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मोर्चा पालिकेवर धडकला. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे, प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, लक्ष्मण क्षीरसागर, कैलास अर्जुने, दयानंद कांबळे, दत्ता गंड, सुधाकर पाटूळे, अभिषेक देवरकर, बालाजी गायकवाड, संतोष तुपसुंदरे, बजरंग ताटे, विजय जाधव, कैलास खंदारे, संतोष आहिरे आदींची भाषणे झाली.

 
Top