परंडा / प्रतिनिधी :- 

दि. २९- परंडा तालुक्यातील कंडारी येथील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक हाजी युनुस बशीर मुजावर ( ८० )  यांचे दि.२७ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते परिसरात मुजावर गुरुजी म्हणून परिचित होते. त्यांच्यावर कंडारी येथील कब्रस्थान मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य धनंजय मोरे, भाजपा नेते ज्योतीराम क्षिरसागर , युवा सेना तालुकाप्रमुख राहूल डोके यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात नऊ मुली , जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते दै. सकाळ चे पत्रकार अलीम शेख यांचे सासरे होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top