परंडा तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीचे निवडणूक होत असून शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० / २ १ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण परंडा येथील गोपीनाथराव मुंडे सभागृहा मध्ये संपन्न झाले. उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ,निवडणूक निरीक्षक मच्छिंद्र सुकटे ,सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक चे सचिन गिरी,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन मनीषा राशिनकर उपविभागीय अधिकारी भूम, यांच्या सुचने नुसार अनिलकुमाार हेळकर तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे दुुुुसरे प्रशिक्षण येथील तहसिलदार अनिलकुुुुमार हेेेेळकर याांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डॉ.तुषार बोरकर, नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड ,नायब तहसीलदार गणेश सुपे यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.या प्रशिक्षणात पीपीटी च्या माध्यमातून तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्राध्यक्ष आणि त्यांच्या टीमने करावयाची कामे सविस्तरपणे पीपीटी च्या द्वारे आणि व्हिडिओ च्या द्वारे मतदान कसे करावे मतदान प्रक्रिया कशी असावी या संदर्भात संपूर्ण माहिती दिली.नायब तहसीलदार डॉ.तूषार बोरकर यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दि.१४ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणूकीच्य प्रशिक्षणाच्या ठिकाणी काही महत्वाचे मार्गदर्शनपर सूचना ही देण्यात आल्या.या प्रसंगी निवडणूक निरीक्षक मच्छिंद्र सुकटे यांनी प्रशिक्षणास भेट दिली.उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मशीनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.तसेच पहिल्या आणि दुसऱ्या प्रशिक्षणामध्ये केलेल्या कामाची सुकटे यांनी पाहणी केली.
