राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळात बदल करून सुधारीत वेळाबाबत शासन मान्यतेने नवीन परिपत्रक जारी केले आहे.
जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुपालकांकडे असलेल्या पशुंना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय सेवा पुरविली जात आहे.तथापि, यानुसार पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळेमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत बदल करण्यात आला आहे.
शासन परिपत्रकान्वये सोमवारी ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत आणि शनिवारी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळात सुरू रहातील. कार्यालय-पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-1/2,तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय सर्व,जिल्हा पशुवैद्यकीय सर्व पशुसर्वचिकीत्सालय,फिरता पशुवैद्यकीय दवाखान्यांना हा आदेश लागू आहे.पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.
बदल झालेल्या वेळेमध्ये पशुवैद्यकीय सेवेचा लाभ पशुपालकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
