उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-2021 करीता मागास प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी ज्या उमेदवारांनी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन पोच पावती घेतली आहे, अशा उमेदवारांनी मागास प्रवर्गातून निवडून आल्याच्या जाहिर प्रगटनाची प्रत तसेच मागास प्रवर्गातून निवडूण आलेल्या महिला उमेदवारांनी त्यांचे निवडून आल्याचे जाहिर प्रगटन, माहेरकडील जात प्रमाणपत्र व माहेरकडील जात नोंद मानिव दिनांकाचे पुरावे तात्काळ सादर करावेत. जेणेकरुन विहित कालावधीत उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एस.टी. नाईकवाडी यांनी केले आहे.  

 
Top