उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हायातील 2020-2021 या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थ्यांनी बारावीला विज्ञान या शाखेत प्रवेश घेतला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्यासाठी प्रस्ताव ऑनलाईन भरुन त्याची प्रत मूळ कागदपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शेजारी, उस्मानाबाद या कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. जेणे करुन त्यांचे पुढील शैक्षणिक प्रवेश सुलभ होतील, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यांनी केले आहे.

 
Top