शिराढोण/ प्रतिनिधी : 

शिराढोण व परिसरात आयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी दि. १९ जानेवारी रोजी जनजागृती रॅली स्थानीक शिराढोण समितीचे प्रमुख चंद्रसेन सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली काढून जनजागृती करण्यात आली. यानंतर संघाचे शिराढोण येथील कार्यकर्ते नवनाथ खोडसे यांच्याकडे दि. २५ जानेवारी सोमवारी ८० वर्षीय शेतकरी बाबासाहेब दादासाहेब लोमटे  (रा. ताडगाव ता.कळंब) हे आले व श्रीराम मंदिराच्या बांधकामसाठी स्वतङच्या शेतीच्या उत्पन्नातील काही रक्कम ४५ हजार रूपये मंदिरासाठी देणगी देण्याचे सांगितले.वडील दादासाहेब लोमटे यांच्या आदेशाने इच्छेनुसार दरवर्षी शेतीउत्पन्नातील रक्कम मंदिरासाठी देण्याची परंपरा आमच्या कुटुंबाची आसून यावर्षी ही रक्कम आयोध्येतील श्रीराम मंदिरास देण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर नवनाथ खोडसे यांनी देणगी रक्कम २० हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम नगदी स्वीकारता येत नसल्याने सदरील रक्कम शिराढोण येथील एन साई बँकेतून श्री राम मंदिर निर्माण तिर्थक्षेत्र आयोध्या यांच्याकडे बँकेमार्फत आरटीजीएस करून ही पावती बाबासाहेब दादासाहेब लोमटे यांना सुपूर्त करण्यात आली.

या दानशूर वृध्द शेतकऱ्यांचे नवनाथ खोडसे, सुरेश महाजन, विष्णू काळे, रमेश यादव, शिवाजी वाळके, राहूल पाटील, संजय पानढवळे, बालाजी काटे, दत्ता पांचाळ, सुदर्शन खडबडे व ग्रामस्थांची अभिनंदन केले. दुष्काळग्रस्त व अतिवृष्टीत होळपणाऱ्या भागातील शेतकऱ्याने श्रीराम बांधकामासाठी तिव्र इच्छा बाळगल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही आदर्श घ्यावा असे आवाहन समितीने केले आहे. 

 
Top