उस्मानाबाद / प्रतिनिधी : 

मतदाराचे जनजागरण करून  मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांना स्मार्ट कार्ड मतदान ओळखपत्र देण्याची मागणी मतदान जनजागरण समिती उस्मानाबाद ने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन समजला जातो, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागरण समितीच्या वतीने प्रमुख ८ मागण्या केल्या आहेत. मतदान  ओळखपत्रास आधारकार्ड लिंक करावे,  मृत्यू पावलेल्या मतदारांचे नांवे  वगळयात यावीत. स्मार्टकार्ड मतदान ओळखपत्र ब-याच मतदारांना मिळालेले नाहीत ते मिळणे गरजेचे आहे. मतदान यंत्राद्वारे मतदान केल्यानंतर छापील पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी,  मतदाराकडे मतदान ओळखपत्र असताना मतदार यादीत नांव सापडत नसल्याकारणाने मतदार मतदानापासून वंचित राहिले जातात.त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, आदी ८ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनावर मतदान जनजागकरण समितीचे धर्मवीर कदम, देवानंद एडके, भारत कोकाटे, गणेश वाघमारे, अब्दुल लतीफ, अब्दुल मजीद, दिपक पांढरे, गणेश वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

राष्ट्रीय मतदार दिन साजरा

११ वां राष्ट्रीय मतदार दिन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने महसूल सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी मतदान व मतदार यांच्याविषयी कांही लेखी सूचना देण्यात आल्या. यावेळी नवीन मतदारांना मतदान ओळखपत्र देण्यात आले. नायब तहसीलदार एस.डी बोधीकर, नायबतहसीलदार प्रियंका लोंखडे, संतोष गायकवाड, मोईस काझी यांच्यासह मतदान जनजागरण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top