शिराढोण/ प्रतिनिधी : 

सध्या शिराढोण व परिसरामध्ये शेती विहरींना व बोअरवेल्सला पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे पाणी समाधानकारक उपलब्ध आसून या पाण्याच्या भरवशावर परिसरातील शेतकऱ्यांनी नगदी पिक ४० टक्के ऊस व उर्वरीत ६० टक्के मध्ये रफबी हंगामाचा पेरा केला. परंतू या भागातील शेतकऱ्यांवर महावितरण ३३ के.व्ही. विद्यूत केंद्राच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे १० तास थ्री फेस पुरवठयात किमान २० ते २४ वेळा पुरवइा खंडीत होतो तर वारंवार पुरवठा मुरूड वरून बंद होतो. यामध्ये रात्रपाळीत फ्यूज कॉलसाठी रात्री लाइनमन फ्यूज टाकण्यासाठी अंधारात आडचणीत जाण्यासाठी टाळाटाळ करतात यामुळे रात्र-रात्र शेतकऱ्यांच्या थ्रीफेस पुरवठा बंदच आसतो.

शिराढोण हे गावठाण योजनेत करूनही गावठाणावर दाभ हे गाव घेतल्याने पुरवठा सतत खंडीत होतो. शिराढोण परिसरातील विद्युत वितरणचे कामे निष्कृष्ट दर्जाचे अभियंता व गुत्तेदारांच्या संगनमताने कामे दर्जेदार न झाल्याने सतत बीघाड होऊन पुरवठा खंडीत  होतो व खंडीत झाल्यापासून पुन्हा पुरवठा सुरूळीत होण्यासाठी तासंतास शेतकऱ्यांना लाइनमनची वाट बघत बसावी लागत आहे. यामुळे शिराढोण परिसरातील शेतकऱ्यांवर महावितरणचे संकट निर्माण झाले आहे. हे संकट दुर करण्याची मागणी होत आहे. 

 
Top