उस्मानाबाद / प्रतिनिधी

भाई उद्धवराव पाटील यांनी कष्टकरी, शेतकरी, यांच्यासाठी तत्वनिष्ठपणे कार्य केले. राजकारणात कधी तडजोड त्यांनी केली नाही. शेतकऱ्यांशी असलेली निष्ठा यामुळे त्यांनी मोठया प्रमाणात त्याग केला. त्याचा अभ्यास सध्याच्या युवा पिढीने करने गरजेचे आहे. सध्याचे राजकारण मात्र तत्वाला सोडून आहे. लोकांना विश्वासात न घेता, लोक हित न पाहता उभारलेल्या संस्था टिकवण्यासाठी तत्वाला सोडून राजकारण केले जात आहे. परंतू असे राजकारण फारकाळ टिकत नाही, अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अामदार रोहित पवार यांनी केले. 

गुरूवार दि. २१ जानेवारी रोजी भाई उद्धवराव पाटील विचारमंच च्या वतीने भाई उद्धवराव यांची १०१ वीं जयंती समारोह व कोवींड योध्दयांचा सन्मान तसेच अामदार रोहित पवार यांचे युवा पिढी व राजकारण या विषयावर मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर तर प्रमुख अतिथी म्हणून अामदार संजय शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ११ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. 

पुढे बोलताना अामदार रोहित पवार यांनी राजकारणातील लोकांचे मते आपल्याला पटले नाहीत तर युवा वर्गांने पुढे येऊन त्यांना विरोध करणे आवश्यक आहे. राजकारणी लोक विविध कारणे देऊन आपल्या भूमिका बदलतात. परंतू सामान्य लोकांना बदलेल्या राजकारणी लोकांच्या भूमिके मागचा हेतू समजतो, त्यामुळे स्वच्छ मनाने व सरळ मार्गाने राजकारण करणाऱ्या लोकांना लोक साथ देतात. भाई उद्धवराव पाटील यांनी १९४५ साली फुलचंद गांधी यांच्या व्यासपीठावर येऊन त्यांच्या सावकारकी विरोधात, स्पष्ट मत नोंदविले होते. त्यामुळे लोकांनी भाई उद्धवराव पाटीलयांना साथ दिली. यावेळी पवार यांनी पत्रकार आर्णव गोस्वामी यांच्या मोबाईल चॉट मधील माहिती बाहेर आल्याचे सांगत जर कोणी राज्य व राष्ट्राच्या विरोधात असेल तर लोकांनी बोलले पाहिजे. नाहीतर भविष्यात आडचणींना सामोरे जावे लागेल, असा इशारा ही त्यांनी दिला. भाई उद्धवराव पाटील १० वींत असताना त्यांनी निजामाच्या शाळेत शिकत असतांना ही त्यांच्या विरोधात बंड केले, अशी आक्रमता युवा पिढीत असली पाहिजे, असे सांगून अामदार पवार यांनी गेल्या १०० दिवसापासून शेतकरी आंदोलन दिल्लीत चालू आहे. आंदोलनापूर्वीच प्रश्न समजून घेऊन सोडविले असते तर अशा आडचणी आल्या नसत्या असा टोला ही त्यांनी लगावला. युवा पिढीने गट-तट-जात-धर्म हे न पाहता राजकारणात यावे व आपल्या ताकदीने पुढील आव्हाने एकत्र येत  चळवळीने सोडवुन परिवर्तन घडवावे, असे आवाहन ही अामदार पवार यांनी केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भाई उद्धवराव पाटील यांनी कष्टकरी, शेतकरी, सूखी व्हावा म्हणून अथक प्रयत्न केले. परंतू आज गावा-गावातील नकारात्मक अर्थकारण गावे औस पडण्यास मदत करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तावक प्रा. आदित्य धनंजय पाटील यांनी केले. तर स्वागत प्राचार्य आर.एस.देशमुख धीरज घुटे, एन.व्ही.शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवी सुरवसे व प्रा. अमोल दिक्षीत यांनी केले. तर आभार ए.एन.पाटील यांनी मानले. कार्यक्रमास भाई धनंजय पाटील, राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे, प्रतापसिंह पाटील, नितीन बागल, सक्षणा सलगर , अमित शिंदे, सुरेखा जाधव प्रा. सुशिल शेळके, माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुुंके, प्रा.चंद्रजित जाधव, नगरसेवक प्रतीप मुंडे, विद्यार्थी वर्ग, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमास २ तास उशिर होऊन देखील मोठया प्रमाणात गर्दी होती. 

 
Top