उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 शहरातील तुळजापूर रोडवरील बेंबळी कॉर्नर येथे प्रस्तावित फूट ओव्हर हेड ब्रीजचे काम तत्काळ पूर्ण करून या पुलाला छत्रपती संभाजी राजे पथमार्ग असे नाव देण्याची मागणी भाजप ओबीसी सेलचे माजी जिल्हा सरचिटणीस संतोष क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेंबळी कॉर्नर येथे महामार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांनी दोन वर्षांपूर्वी अंडरपासची मागणी केली होती. परंतु, सध्या सर्व्हिस रोडने एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. परंतु, दुसऱ्या बाजूस असलेल्या वसाहतीसह शासकीय तंत्रनिकेतनकडे जाण्यासाठी महामार्गावरूनच विद्यार्थ्यांसह नागरिकांना धोकादायक मार्गक्रमण करावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी ओव्हरहेड ब्रीज मंजूर झाला. परंतु, याचे काम संथगतीने सुरू आहे. काम तातडीने पूर्ण करून या ओव्हरब्रिजला छत्रपती संभाजी राजे पथमार्ग नाव देण्याची मागणी करताना दि.२७ जानेवारीपर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्यास महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चप्पल वर्षाव मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.


 
Top