उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 तहसीलच्या अभिलेखे कक्षातून शेतकऱ्याला फेरफार नक्कल देण्यासाठी १०० रुपयांची लाच घेणाऱ्या कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरूवारी (दि.२८) दुपारी रंगेहात पकडले. वरूडा येथील एका शेतकऱ्याला त्याच्या आजोबाच्या नावावरील जमिनीच्या १९९२ मधील फेरफारची नक्कल न्यायालयीन कामकाजासाठी हवी होती. यासाठी बेंबळी सज्जाचा कोतवाल व सध्या उस्मानाबाद तहसीलच्या अभिलेखे कक्षात कार्यरत दत्तात्रय माणिक तिगाडे (३८) याने २०० रुपयांची लाच मागितली. शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केल्यावर सापळा रचून अटक केली. उप अधीक्षक प्रशांत संपते, पीएसआय गौरीशंकर पाबळे यांनी ही कारवाई केली.ही कारवाई करण्यास पोह शेख, पोना जाधव, मारकड, पोकॉ बेळे, डोके, आचार्य यांनी मदत केली. 



 
Top