कळंब ( शिवप्रसाद बियाणी

 नगर परिषदेच्या झालेल्या विषय समीती  निवडणूकित राष्ट्रवादी, शिवसेना यांची आघाडी झाली असून शिवसेनेच्या वाट्याला महिला व बालकल्याण समिती देण्यात आली. या समितीच्या सभापती पदी सौ.सुरेखा पारख ,तर उपसभापती म्हणून सौ.अश्विनी शिंदे यांची निवड  करण्यात आली.

 विषय समिती निवडीत पाणी पुरवठा आरोग्य व स्वच्छता समीतीमध्ये  पदसीध्द  सभापती पदी  संजय पांडुरंगजी मुंदडा , सदस्यपदी सौ. गीता महेश पुरी , सौ. साधना कांतीलाल बागरेचा, मुश्ताक गफूर कुरेशी, अनंत सुभाष वाघमारे यांची निवड झाली तर   बांधकाम व पुरवठा समिती   सभापती पदी  सौ. इंदुमती जयनंदन हौसलमल  तर सदस्यपदी अमर विजय गायकवाड,  सौ. सफूरा शकील काझी, सौ. मीरा भागवत चोंदे, श्री सतीष श्रीधर टोणगे यांची निवड झाली.  शिक्षण विद्युत व रहदारी नियमन समीतीच्या सभापती पदी सुभाष सुर्यभान पवार  तर सदस्यपदी सौ. गीता महेश पुरी , सौ. साधना कांतीलाल बागरेचा, सौ. अश्विनी सुरेश शिंदे ,  श्री अनंत सुभाष वाघमारे यांची निवड झाली.     महीला व बालकल्याण समीतीच्या सभापती पदावर   सौ. सुरेखा राजेश पारख, उपसभापती पदावर सौ. अश्विनी सुरेश शिंदे, तर सदस्यपदी सौ. मीरा भागवत चोंदे , श्री सतीश श्रीधर टोणगे, सौ. गीता महेश पुरी यांची निवड झाली. तर स्थायी समीतीवर सदस्य म्हणून श्री लक्ष्मण  मनोहर कापसे यांची वर्णी लागली. 

स्थायी समीती  पदसीध्द सभापती पदावर सौ. सुवर्णा सागर मुंडे तर सदस्यपदी संजय पांडुरंगजी मुंदडा,सौ. इंदुमती जयनंदन हौसलमल , सौ. सुरेखा राजेश पारख, श्री सुभाष सुर्यभान पवार, श्री लक्ष्मण मनोहर कापसे याची निवड झाली. पीठासीन अधीकारी म्हणून  सौ. मंजुषा लटपट, तहसीलदार यांनी काम पाहिले तर  त्यांना सहकार्य   देवीदास जाधव मुख्याधिकारी 

श्री दिपक हारकर, कार्यालयीन अधिक्षक  श्री सुधीर चोंदे विभाग प्रमुख यांनी केले. नगराध्यक्षा सौ. सुवर्णा ताई  मुंडे    उपाध्यक्ष  संजय मुंदडा, गट नेते शिवाजी कापसे यांनी नुतून सभापतींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


 
Top