उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभागृहांमध्ये महात्मा गांधी तथा मोहनदास करमचंद गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन जि. प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी करून पुष्पहार अर्पण केला. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. हुतात्मा दिना निमित्त उपस्थित मान्यवरांनी सभागृहांमध्ये दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन कालावधी वाढवला आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून सभागृहातील उपस्थितांनी सुरक्षित अंतर ठेवणे होते.

सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.व्ही.सावंत,वरिष्ठ सहाय्यक एफ.ए.पटेल, बांधकाम विभागातील कार्यालय अधीक्षक नागनाथ कुंभार, पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी देशमुख यांच्यासह कार्यालय विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी - कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

 
Top