उस्मानाबाद / प्रतिनिधी

मोहतरवाडी (विठ्ठलवाडी) ता. उस्मानाबाद येथील  शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून  अध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची  तर सचिवपदी गणेश चव्हाण यांची निवड  करण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील (विठ्ठलवाडी )मोहतरवाडी येथील शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यासाठी परमेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदी विठ्ठल उद्धव चव्हाण, उपाध्यक्षपदी राम चव्हाण,  खजिनदारपदी अंकित चव्हाण, सचिवपदी गणेश चव्हाण व विठ्ठल भारत चव्हाण, रितेश काका चव्हाण यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top