उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जीएसटी कायद्याच्या विरोधात तसेच जीएसटी पोर्टलमध्ये गतिमानता आणून सुसूत्रता आणने, संख्या रिटर्नची संख्या कमी करून दंड रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.२९) उस्मानाबादेत वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयासमोर कर सल्लागार आणि व्यापाऱ्यांनी संयुक्तरीत्या एक तास घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर जीएसटी अधिकारी भगवंत चेचे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जीएसटी अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकारने २०१७ मध्ये देशभरात जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला. करामध्ये सुसूत्रता आणून कर रचना सोपी करण्याचा यामागे उद्देश होता. परंतु, सध्या सीए व कर सल्लागारांना जीएसटी पोर्टलवर अनेक अडचणी भेडसावत आहे. जीएसटी पोर्टल गतिमान असल्याने त्यास उशीर झाल्यास दंडात्मक कारवाई होत आहे. मागील चार वर्षांपासून यामध्ये सुधारणा झालेली नाही. अनेक वेळा कायद्यामध्ये रातोरात बदल होत असल्याने कर सल्लागारांची गोची होत आहे. शिवाय व्यापारी व कर सल्लागारांत अविश्वास निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे जीएसटी कायद्यातील जाचक अटी आणि नियम दूर करणे, जीएसटी कायदा व जीएसटी पोर्टलमध्ये रिवाईज जीएसटी रिटर्न्सची सुविधा द्यावी, सुसूत्रता आणून ते गतिमान करावे, लेट फी व दंड कमी करावा, जीएसटीची तरतूद करताना करदाते, सीए, कर सल्लागारांना विचारात घ्यावे, जीएसटी कॅन्सलेशन ई-वे बिल बँक स्टेटमेंट रद्द करावे, एक कायदा एक रिटर्न ठेवावे, दोन कोटीपेक्षा कमी विक्री असणाऱ्यांना जीएसटी पेमेंट रिटर्न तीन महिन्यांनी भरण्याची सुविधा द्यावी, जीएसटी ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी, १६-चार सेक्शन रद्द करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनाही निवेदन देऊन अवगत करण्यात आले. कर सल्लागार, व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्याने विविध मागण्यांचे फलक घेऊन रॅली काढली. यावेळी सीए बी. बी. ताम्हाणे, सीए राधेश्याम तापडीया, सीए दीपक भातभागे, सीए गोरोबा घोडके, सीए अभिषेक मिनियार, सीए दत्तात्रय टोणगे, अमोल लोढा, विश्वजीत बरबडे, राहुल पाटील, वैभव जाधव, श्रीकांत टाकणे, अमोल लोहार, अजय नाईक, अॅड. दयानंद बिराजदार, अॅड. राहुल दुरुगकर, अॅड. रवींद्र कदम, सिध्दार्थ विठ्ठलदास, समाधान आवारे, संजय मंत्री, शाम भन्साळी, श्रीराम कोरडे, भालचंद्र जाधव, मुकेश नायगावकर अादी उपस्थित होते.

सल्लागारांना जीएसटी पोर्टलवर अनेक अडचणी भेडसावत आहे. जीएसटी पोर्टल गतिमान असल्याने त्यास उशीर झाल्यास दंडात्मक कारवाई होत आहे. मागील चार वर्षांपासून यामध्ये सुधारणा झालेली नाही. अनेक वेळा कायद्यामध्ये रातोरात बदल होत असल्याने कर सल्लागारांची गोची होत आहे. शिवाय व्यापारी व कर सल्लागारांत अविश्वास निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे जीएसटी कायद्यातील जाचक अटी आणि नियम दूर करणे, जीएसटी कायदा व जीएसटी पोर्टलमध्ये रिवाईज जीएसटी रिटर्न्सची सुविधा द्यावी, सुसूत्रता आणून ते गतिमान करावे, लेट फी व दंड कमी करावा, जीएसटीची तरतूद करताना करदाते, सीए, कर सल्लागारांना विचारात घ्यावे, जीएसटी कॅन्सलेशन ई-वे बिल बँक स्टेटमेंट रद्द करावे, एक कायदा एक रिटर्न ठेवावे, दोन कोटीपेक्षा कमी विक्री असणाऱ्यांना जीएसटी पेमेंट रिटर्न तीन महिन्यांनी भरण्याची सुविधा द्यावी, जीएसटी ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी, १६-चार सेक्शन रद्द करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 
Top