तेर /  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील रहिवासी रोहित अशोक जोशी  हा युवक झेक प्रजासत्ताक (युरोप) मध्ये आण्विक जीवशास्त्र आणि स्ट्रक्चरल बायोलॉजी या संशोधन क्षेत्रात प्रामुख्याने प्रथिने रचना, कार्य आणि मानवी रोगांमधील नियमनावर संशोधनाचे काम करत आहे.

 रोहित अशोक जोशी हे उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील रहिवासी असून सध्या ते सोलापूर येथे स्थायिक असून  त्यांचे प्राथमिक शिक्षण, जिल्हा परिषद  प्राथमिक मुलांची शाळा, पांगरी ता. बार्शी येथे झाले  तर माध्यमिक शिक्षण, छत्रपती शिवाजी विद्दयामंदीर पांगरी ता. बार्शी. येथे झाले तर अकरावी आणी बारावी दयानंद काॅलेज, सोलापूर येथे झाले व पीएचडी कोंकूक युनिव्हर्सिटी, साऊथ कोरीया येथे Molecular Biotechnology  या  विषयावर झाली.सध्या रोहित जोशी हा युवक झेक प्रजासत्ताक देशात Academy of Science, Prague येथे आण्विक जीवशास्त्र आणि स्ट्रक्चरल बायोलॉजी या संशोधन क्षेत्रात प्रामुख्याने प्रथिने रचना, कार्य आणि मानवी रोगांमधील नियमनावर संशोधन काम करत आहे.

 
Top