कळंब / प्रतिनिधी-  

कोरोना योद्ध्यां”च्या हक्कांच्या रक्षणार्थ आता पुन्हा सव्वीस जानेवारी ‘प्रजासत्ताक दिनी’च “थाळीनाद आंदोलन व निदर्शने” राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून शासन व प्रशासनासह जनतेलाही न्याय याचना करतील,अशा ईशारा सामाजिक कार्येकर्ते तथा “महामारी योद्धा संघर्ष समितीचे मुख्य संयोजक संतोष भांडे निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या महारोगाशी मुकाबला करण्याकरीता राज्यशासनाच्या आरोग्य विभागामार्फत डाॅक्टर,औषधनिर्माता,तंत्रज्ञ,स्टाफ नर्स,कक्षसेवक,अॅम्ब्यूलंन्स ड्रायव्हर,सफाई कामगार,सुरक्षा रक्षक,स्टोअर आॅफिसर,डेटा एंन्ट्री आॅपरेटर अशी व ईतर असे विवीध पदांवर सुमारे वीस हजारांपेक्षाही अधिक कंत्राटी,हंगामी व रोजंदारी आरोग्य कर्मचार्यांची भरती करण्यात आली आहे,याच कर्मचाऱ्यांच्या बळावर महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात आणण्यात यश येत आहे,या कर्मचार्यांनी लाॅकडाऊन कालखंडात,अतीशय त्यागपुर्ण सेवा महाराष्ट्रातील जनतेला देवून,कोट्ट्यावधी जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची भुमिका पार पाडली आहे,या कर्मचार्यांना सेवेत घेत असताना विहीत शैक्षणिक अर्हता,अनुभव,गुणवत्ता,तसेच सर्व प्रकारच्या सामाजिक आरक्षणा प्रमाणेच या नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत,मात्र आता महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव जस-जसा कमी होवू लागला तस-तसे या कर्मचार्यांना सेवामुक्त करण्याचा राज्यशासनाने सपाटाच लावला असून,या राज्यशासनाच्या विरोधात “महामारी योद्धा संघर्ष समिती” ने मागील अनेक महीन्यांपासून राज्यभरात विवीध अधिकारी,पदाधिकारी,लोकप्रतिनीधी यांना निवेदने देवून,’सदर कर्मचार्यांना कामावरून कमी करू नये’ अशा विनंत्या केल्या,समिती प्रमुख संतोष चत्रभुज भांडे यांचे नेतृत्वात राज्यभरातील हजारों कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे निदर्शने व आंदोलन केले. 

या आंदोलनाचे फलीत म्हणून राज्यशासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान चे संचालक डाॅ.सतिश पवार व डाॅ.अनिल बोटले यांनी शिष्टमंडळाच्या बैठकी दरम्यान राज्यातील सर्व कंत्राटी,हंगामी व रोजंदारी कर्मचार्यांना आठ दिवसांत नाॅन कोविड मध्ये वर्ग करून,सर्वांची सेवा पुढे चालू ठेवण्याबाबतचे तोंडी आश्वासन देत,तसा प्रस्ताव वरीष्ठांना सादरही केला,तसेच मागील कांही दिवसांपुर्वी कळंब येथील एका खाजगी हाॅस्पीटलच्या शुभारंभा दरम्यान केलेल्या भाषनात राज्यातील सर्व कंत्राटी,हंगामी व रोजंदारी कर्मचार्यांची सेवा पुढे चालू ठेवण्याच्या भुमिकेला दुजोरा दिला.मात्र अद्यापही कार्यमुक्त केलेल्या कर्मचार्यांना परत सेवेत रूजू करून घेण्यात आलेले नसून,उलट कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्याचा सपाटा चालुच आहे.तसेच राज्य सरकारची ही भुमीका “युज अॅन्ड थ्रो” ची असल्याचा आरोप संतोष भांडे यांनी केला असून,”कोविड योद्ध्यां”चा सन्मान करण्याकरीता थाळीनाद करणाऱ्याा शासन व प्रशासनाला खडबडून जागे करण्याकरीता व “कोरोना योद्ध्यां”च्या हक्कांच्या रक्षणार्थ आता पुन्हा सव्वीस जानेवारी ‘प्रजासत्ताक दिनी’च “थाळीनाद आंदोलन व निदर्शने” राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून शासन व प्रशासनासह जनतेलाही न्याय याचना करतील,अशा ईशारा सामाजिक कार्येकर्ते तथा “महामारी योद्धा संघर्ष समितीचे मुख्य संयोजक संतोष भांडे निवेदनाद्वारे दिला आहे.


 
Top