उस्मानाबाद / प्रतिनिधी

 30 वी ऑनलाईन रेशीमशेती चर्चासत्र दि. 20 जानेवारी रोजी पार पडले. त्यात 27‍ जिल्हयातील रेशीम शेतकऱ्यासह अधिकारी सहभागी झाले होते. त्यात मुख्य अतिथी म्हणुन मा. डॉ विकास महात्मे साहेब राज्यसभा खाजदार, अभिमन्यू पवार साहेब (आमदार, औंसा), मा. विनयकुमार आवटे (क्रषी उपायुक्त, महाराष्ट्र) हे मान्यवर उपस्थीत होते.

 तसेच रेशिम तज्ञ व मार्गदर्शक ‍कॅप्टन कलंत्री साहेब (माजी रेशिम संचालक, महाराष्ट्र), डॉ. अधिकरराव जाधव (शिवाजी विदयापीठ, कोल्हापुर), डॉ. लटपटे सर प्रभारी अधिकारी रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक क्रषी विदयापीठ, परभणी) डॉ. संजय पांढरे (संचालक महा एफपीओ फेडरेशन, पुणे), दिलीप हाके साहेब (उपसंचालक औरंगाबाद),

 तसेच रेशीम क्षेत्रातील तज्ञ शेतकरी म्हणून बालाजी पवार, नवनाथ रसाळ, राहुल बाबर, बालाजी हाके, सोपानराव शिंदे उपस्थित होते.

 वरील सर्व मान्यवर व शेतकरी यांच्यात 2 तासापेक्षा अधिक चर्चा होऊन महाराष्ट्रामध्ये रेशिम शेतीमध्ये कशाप्रकारे सुधारणा करुन वाढ करण्यात येईल तसेच रेशिम शेतीला विमा, पीक कर्ज, अध्यावत रेशिमशेड व यांत्रीकीकरण याविषयावर सर्व मान्यवर, तज्ञ व शेतकरी यांच्यामध्ये सखोल चर्चा करण्यात आली. तसेच 30 रेशिम सत्र योग्यरीतीने पार पाडल्यामुळे सर्व मान्यवरांनी तज्ञ व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

 
Top