उस्मानाबाद/ प्रतिनिधी
हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाइलचा शोध सायबर पोलिस ठाण्यामार्फत निरंतर घेतला जातो. अशाच एका हरवलेल्या फोनच्या शोधात असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२० रोजी कारवाई करून एकाला अटक करत चोरीतील दोन मोबाइल जप्त केले.
चोरी व हरवलेल्या मोबाइलच्या शोधमोहिमेदरम्यान सायबर पोलिसांकडून पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीचे उपनिरीक्षक पी.व्ही. माने व पथकाने पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सचिन जिगनू पवार याच्या सध्या राहत असलेल्या उस्मानाबाद शहरातील जुना बसडेपो परिसरातील सासरवाडीच्या घराची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन चोरीस गेलेले मोबाइल आढळून आले. हे मोबाइल पथकाने जप्त करत आरोपीलाही अटक केली. ही कारवाई एलसीबीचे पोनि घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माने, पोना हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोलिस काॅन्स्टेबल अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, मनोज मोरे, रंजना होळकर यांच्या पथकाने केली.
