तुळजापूर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हाअधिकारी कौस्तुभदिवेगावकर यांच्या मार्गदर्शन नुसार येथील तहसिल कार्यालयात प्रत्येक महिन्याचा पहिल्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार असल्याची माहीति तहसिलदार सौदागर तांदळे यांनी दिली.

या लोकशाही दिनासाठी तालुकास्तरीय कार्यालय प्रमुख हजर राहणार आहेत तर मंडळ स्तरावरील लोकशाही दिनासाठी मंडळ स्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थितीत राहणार आहेत.

तरी जनतेने शेती रस्ता ग्रामविकास विद्युत विभागविषयक समस्या सह इतर कोणत्याही समस्या ज्या शेतकरी बांधवांचा आहेत त्यांनी त्यांनी 1फेब्रुवारी रोजीचा लोकशाही दिनात  लेखी अर्जाध्दारे स्वता उपस्थितीत राहुन कळवाव्यात लोकशाही दिनातील प्राप्त प्रश्न समस्यासंबधित विभागाकडुन तात्काळ सोडविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

 
Top