तुळजापूर/ प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेस नातीला मुल होवु दे तुला त्या बालकाचा वजनाचे चांदी अर्पण करेन याची नवसपुर्ती झाल्याने हैद्राबाद येथील देविभक्त सतिशकुमार प्रेमाचार्य यांनी आपल्या नातवाचा वजनाची सुमारे तीन किलो चांदीचे ताट वाट किंमत अडीच लाख रुपयाचे प्रजासत्ताक दिनी तिर्थक्षेञ तुळजापूर ला येवुन देवीदर्शन करुन अर्पण केले .

देवीला चांदीची ताट-वाटी अर्पण केल्यानंतर मंदीर संस्थान वतीने धार्मिक व्यवास्यापक सिध्दैश्वर इंतुले यांनी सतिश कुमार यांचा देविची प्रतिमा व महावस्ञ देवुन सत्कार केला. यावेळी सतिश कुमार प्रेमाचार्य यांचे कुंटुंब उपस्थितीत होते.  

 
Top