कळंब / प्रतिनिधी:

कळंब तालुक्यातील श्रावणबाळ व संजयगांधी निराधार योजनेच्या अनेक लाभधारकांचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने ते वेळेनुसार देण्यात यावे. म्हणुन मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने येथील तहसिल कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

सदरील निवेदनात असे म्हटले आहे की, श्रावणबाळ, संजयगांधी निराधार,तसेच दिव्यांग,विधवा,परितक्त्या, मुकबधीर व अन्य योजनेच्या माध्यमातून येथील तहसिल कार्यालयातुन अनेक लाभधारकांना अनुदान पाठवण्यात येते, परंतु  सदरील लाभधारकांना हे अनुदान बॅंकेकडे वेळेत पाठवण्यात येत नसल्याने अनेक लाभधारक अर्थिक अडचणीत सापडत असुन ते बॅंकेकडे चकरा मारुन बेजार होत आहेत.तर वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्यांची उपासमार सुद्धा होऊ लागली आहे.त्यामुळे सदरील लाभधारकांचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर वेळेनुसार जमा करुन वृद्ध,विधवा,परितक्त्या,दिव्यांग, मुकबधीर, निराधार व अन्य लाभधारकांची उपासमार व गैरसोय थांबवावी अशी मागणी मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे व कळंब तालुकाध्यक्ष धनंजय ताटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top