कळंब  (शिवप्रसाद बियाणी )

शहरातील ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्रा.डॉ हनुमंत चौधरी यांची सरदार पटेल विद्यालय (बालाघाट मध्यप्रदेश) येथील विद्यापीठात गणित विषयाचे पिएचडी प्रबंध परीक्षक म्हणून निवड झाली. पिएचडी मार्गदर्शक म्हणूनही मान्यता मिळाली. तसेच कळंब येथील न. प प्राथमिक शाळा क्र. २ चे मुख्यध्यापक मुकुंद नांगरे याना महानगरपालिका व नगरपालिका शिक्षक संघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हार,बुके व राष्ट्र विचाराचे पुस्तके देऊन त्यांचा त्यांच्या स्वगृही जाऊन गुरुवार दि.७ रोजी सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा संघचालक अनिलजी यादव, ता.संघचालक डॉ. राजेंद्र बावळे, जेष्ठ स्वयंसेवक महेश जोशी, शहर कार्यवाह दत्तात्रय लांडगे,प्रकाश आडसूळ,दादासाहेब पाटील,प्रा.डॉ दत्ता साकोळे, प्रा.डॉ कमलाकर जाधव ,वैजनाथ पकवे,अविनाश खरडकर आदि उपस्थित होते.

 
Top