उस्मानाबाद/ प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई.यांच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने नुकत्याच “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा(२०१९—२०२०)मध्ये घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत राज्यातील विविध विद्यापीठा अंतर्गत सल्गनित असणाऱ्या महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाचे प्रसिध्द होणारी नियतकालिके पाठवली होती.प्रत्येक विद्यापीठातील एका महाविद्यालयास य.च.प्रतिष्ठानने विशेष पारितोषिक नुकतिच घोषित केली आहेत.
सदर स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर संचालित व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संल्गनित असलेल्या उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या “विवेकानंद”नियतकालिकास विशेष पारितोषिक प्राप्त झाल्याचे सदर प्रतिष्ठानने पञातून जाहीर केले आहे.व लवकरच एका खास समारंभात पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे.असे एका पञाद्वारे प्रतिष्ठानने कळवळे आहे.तत्कालिन विवेकानंद नियतकालिकाचे संपादक प्रा.डाॅ.देविदास इंगळे व प्रा.जगताप यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.