मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती उस्मानाबाददि.09 जानेवारी 2021 च्या वतीने श्रीपतराव भोसले महाविद्यालया च्या प्रांगणात संगीत खुर्ची व काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा नगरसेविका सौ.प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या हस्ते राष्ट्र माता जिजाऊ माँसाहेब व शिक्षण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आली.
काव्य वाचन स्पर्धे मध्ये 53 मुली व 40 मुलांनी सहभाग घेतला, काव्य वाचन स्पर्धेत शेतकरी आत्महत्या, हुंडा बळी ,स्त्री शिक्षण,राष्ट्रभक्ती अशा विविध विषयांवर कविता व चारोळ्या सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य साहेबराव देशमुख, प्रमुख पाहुणे, अतुल कावरे, मनोज देशमुख ,अभय तांबे, डॉ दीपिका सस्ते, रेहमुन्निसा शब्बीर शेख, राज निकम, लैला आमिर शेख, स्वप्नील पाटील ,धनश्री कोळपे ,मनोज उबरे, दिलीप आदटराव ,अर्चना देशमुख प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उप प्राचार्य संतोष घार्गे ,मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोऱ्हे सौ उमाताई देशमुख, डॉ.सौ मंजुळा आदित्य पाटील, र्यवेक्षक तानाजी हाजगुडे ,नंदकुमार नन्नावरे होती. काव्य वाचन स्पर्धेनंतर खिलाडू वृत्तीला चालना देण्यासाठी व त्यातून मनोरंजन निर्मितीसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले. यासाठी मुला -मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कला ,विज्ञान व वाणिज्य विभागाचे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. नंदकुमार नन्नावरे यांनी केले.
त्याचबरोबर मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती 2021 चे मानाचे पुरस्कार देखील अध्यक्ष सौ प्रेमा ताई पाटील यांनी जाहीर केले ते खालील प्रमाणे आहेत
१ )राजमाता जिजाऊ पुरस्कार- डॉ प्राचार्य सौ सुलभा देशमुख
२) राजर्षी शाहू महाराज सामाजिक कार्य पुरस्कार - प्राचार्य आनार साळुंके मॅडम
३)कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षक रत्न पुरस्कार - श्री विक्रम (भैय्या) पाटील सर
४)शहाजीराजे क्रीडा पुरस्कार -श्री प्रवीण बागल सर
५ ) युवा उद्योजक पुरस्कार
हे वरील पुरस्कार फेब्रुवारी महिन्यामध्ये देण्यात येतील
