उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रांताचा कार्यकर्ता अभ्यास वर्ग उस्मानाबाद शहरातील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे नऊ जानेवारीपासून सुरू झाला असून या अभ्यास वर्गाचा समारोप होत आहे.

या प्रदेश अभ्यास वर्गात अभाविपचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्री देवदत्तजी जोशी तसेच प्रांत प्रमुख प्राध्यापक प्रशांत साठे सर प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सारंग जोशी सर आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आलेले अभाविप चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत. या कार्यकर्ता अभ्यास वर्गाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रांतातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मागील वर्षभर केलेल्या विद्यार्थीभिमुख कार्याची प्रदर्शनी तसेच विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून केलेली आंदोलने आणि इतर शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी केलेला संघर्ष प्रदर्शनीचे याच्या आयोजनही करण्यात आले आहे. अभाविपचे राष्ट्रीय कार्यकर्ते अनिकेत ओहाळ यांच्या अकाली निधनाने कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या श्रद्धा तसेच त्यापासून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने या चित्र प्रदर्शन कक्षाला अनिकेत  ओव्हाळ यांचे नाव देण्यात आले आहे. 

या चित्रप्रदर्शन मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांची माहिती देणारी चित्रप्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा उस्मानाबादच्या वतीने मागील वर्षभरात केलेले विविध कार्यक्रम उपक्रम आंदोलने यांचे चित्र आणि त्या अनुषंगाने माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य व्हि व्हि माने तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापिका गीता सांगवीकर आणि प्रदेश सहमंत्री अंकिता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 10 जानेवारी रविवारी या अभ्यास वर्गाचा समारोप होणार आहे .

 
Top