परंडा/ प्रतिनिधी -

सोशल मीडियाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने युवा पत्रकार माध्यामाशी जुळला आहे. येणाऱ्या काळात प्रसार माध्यामाचे महत्त्व वाढणार आहे, असे मत सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक संजय मिस्किन मुंबई यांनी व्यक्त केले. परंडा तालुका युवा पत्रकार संघ व कर्मवीर परिवारांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

  पंचायत समिती सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदांतचार्य हभप दत्तात्रय महाराज हुके होते. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून तहसिलदार अनिलकुमार हेळकर, पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे,नायब तहसीलदार पांडुरंग इनामदार,युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील,युवा उद्योजक अमर साळुंके,राखीताई देशमुख आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना संजय मिस्किन म्हणाले, प्रसारमाध्यमे ही समाजातील घडणाऱ्या घटनांची झाडांझडती घेणारा चव्हाटा आहे. नागरिकांच्या अडचणीची जाणीव करुन देण्याची व सोडवण्याची जबाबदारी माध्यमांची असल्याचे त्याचबरोबर विश्वसनीय आणि तथ्य पूर्ण बातमी द्यावी , वृत्तापत्रातील बातमीचा जनमाणसांवर प्रभाव पडतो त्याचे परिणाम उमटतात त्यामुळे पत्रकारांनी विश्वासर्हता बाळगावी असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे तहसीलदार हेळकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, आजच्या पत्रकारांसमोर समाजसुधारण्याचे मोठे आव्हान आहे.समाजातील समस्यांवर लिहण्याची जबाबदारी त्यांची आहे.हभप दत्तात्रय महाराज हुके यांनी सांगितले की, समाजामध्ये काही गोष्टी योगाने प्राप्त होतात पण योगाने प्राप्त झालेल्या गोष्टी टिकवायची असतील तर त्यासाठी जीवनामध्ये क्षम असावा लागतो पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने जीवनामध्ये पुरस्काराचे स्वरूप म्हणून कामकाज टिकवले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषण झाले.

 कार्यक्रमात पत्रकार विजय माने यास शाहीर अमर शेख पुरस्कार,पत्रकार सुरेश घाडगे यांना शाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कर,पत्रकार मुजीब काझी याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कर ,आदर्श पत्रकार संघ कळंब यांना आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जगतगुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार ह.भ.प. पांडुरंग लिंबाजी चोबे (पाटील ) कायदा-सुवस्था कोरोना महामारीच्या काळात स्वःताची व परिवाराची काळजी न करता रात्र दिवस काम करणारे पोलिस रामराजे शिंदे यास शहीद अशोक कामटे पुरस्कार,रावसाहेब खरसडे यास ग्रामीण भागातील आदर्श राजकीय व्यक्तिमत्व लोकनेते कै.यशवंतरावजी चव्हाण पुरस्कार,  शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षक धनराज बनसुडे महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार , कृषी क्षेत्रात धडपड्या युवक हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक पुरस्कार , सुमित वेताळ यास आरोग्य  क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.आनंदीबाई जोशी आदर्श पुरस्कार डॉ.जहूर सय्यद , ग्रामीण भागात आरोग्य सेवेत तत्पर सावित्रीबाई फुले आदर्श आशा कार्यकर्ती पुरस्कार नम्रता विठ्ठल चौधरी , सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्थेस समाजसेवक बाबा आमटे पुरस्कार श्री भैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार अब्बास सय्यद, आबासाहेब बोराडे, शितल कुमार घोंगडे, परमेश्वर पालकर,हारुण शेख, भजनदास गुडे, प्रमोद वेदपाठक,आनंद खर्डेकर, प्रकाश काशिद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल अंधारे, ईश्वर ईटकर,अविनाश ईटकर,भरत ननवरे,रामा गवारे,अशोक माने, जनार्दन डांगे,सुरज रणभोर, प्रशांत खैरे,संतोष शिंदे, कानिफनाथ गोरे, आशुतोष बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यवान रोडगे यांनी केले.आभार रणजित पाटील तर सुत्रसंचालन बालाजी बोराडे यांनी केले.


 
Top