उस्मानाबाद/ प्रतिनिधी

नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी कारखान्याचा चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू असून हंगामातील उत्पादीत 4,21,111 व्या साखर पोत्याचे पजून 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांचे शुभहस्ते करण्यात आले. 

 यावेळी बोलतांना नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक कृषिरत्न ठोंबरे म्हणाले, सन 2020-21 या चालू गळीत हंगामात नॅचरल शुगरने 8.00 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्यीष्ट ठेवलेले असून कारखान्याचे गाळप जोमात सुरू असून पांढ-या शुभ्र दाणेदार निर्यातक्षम साखरेचे उत्पादन सुरू आहे. ऊस उत्पादक शेतक-यांनी नॅचरल शुगरच्या पारदर्शी व्यवहारावर विश्वास ठेवून अत्यंत चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच नॅचरल शुगरने केलेल्या नियोजना प्रमाणे ऊस गाळप नियोजन पूर्ण होत आहे. चालु हंगामामध्ये ऊस गाळपास स्वीकारताना कारखान्याचे ऊस नोंद प्रोग्राम प्रमाणे सभासद बिगर सभासद असा भेदभाव न करता सरसकट नोंदी प्रमाणे ऊसाची तोड करून ऊस उत्पादकांचा ऊस गाळपास स्वीकारला जात आहे.

 या वर्षी आपले दैनंदीन 6500 मे.टन  याप्रमाणे ऊसाचे गाळप सुरू असून पुढील वर्षी आपण 7500 मे.टनाची गाळप क्षमता करणार आहोत. तसेच ऊसाचे रसा पासून बी-हेवी मोलासेसचे उत्पादनही सुरू असून त्यामध्येही पुढील वर्षी दुप्पटीने वाढ करणार आहोत. कारखान्याचे गाळप क्षमते बरोबरच नॅचरल शुगरचे आसवनी प्रकल्पाची क्षमता 1 लाख लिटर वरून दीड लाख लिटर प्रतिदीन करणार असल्याने पुढील गाळप हंगामामध्ये नॅचरल शुगर विक्रमी म्हणजेच 14 लाख मे.टन ऊस गाळप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 सोशल डिस्टन्सींगचे आणि मास्क वापरण्याच्या नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम पार पडला. सदर साखर पोते पूजनास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top