उस्मानाबाद/ प्रतिनिधी

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याच पार्श्वभूमीवर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान टीम उस्मानाबाद यांच्या वतीने आणि भा. ज.यु.मो उस्मानाबाद आणि सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांच्या सहकार्यने प्रतिष्ठान भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या उत्तम प्रतिसाद मिळाला.

या शिबीरामध्ये  एकूण ४९ जणांनी रक्तदान केले. तरुणांनी सुद्धा या मध्ये भरपूर प्रतिसाद दिला होता.यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित नितीन काळे,राजसिंह राजेनिंबाळकर,डॉ. शशिकांत करंजकर, प्रा.बाळकृष्ण उंबरे,विशाल पाटील, बालाजी सुरवसे सह आदी पत्रकार बांधव आणि मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान टीम उस्मानाबाद च्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील कार्यसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान उस्मानाबादचे सर्व सदस्य उपस्थित होते.


 
Top