तेर/ प्रतिनिधी-

 सामाजिक कार्य करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र संत विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.बळवंतराव यांनी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे १२ वी च्या विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी कै.डाॅ.चंद्रकलादेवी  पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त  आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी बळवंतराव बोलत होते.प्रमुख पाहूणे  पी.बी.कोकाटे, एस.एस.सामते,एस.आर.पाटील,एस.एस.खटींग,कला शिक्षक नवनाथ पांचाळ उपस्थिती होती.प्रास्ताविक संयोजक नरहरी बडवे यांनी केले.


 
Top