तुळजापूर / प्रतिनिधी : -
तालुक्यातील दहीवडी येथे बुधवार दि4 रोजी कै शहाबाई भागवत भोसले यांच्या प्रथम वर्षश्राध्दा निमित्ताने शिवलिला पाटील यांचे किर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले
यावेळी शिवलिला पाटील यांनी जो तरुण आपल्या आई वडीलांचा सांभाळ करु शकत तो पत्नी चा तरी कसा व्यवस्थित सांभाळ करेल असा सवाल केला हुंडा देवु नका घेवु नका, असे आवाहन यावेळी केला शिवलिला पाटील यांनी आपल्या किर्तनातुन अर्धमावर प्रहार करुन धर्माचे आचारण करा जिवनात यशस्वी व्हाल असे यावेळी म्हणाले यावेळी दहीवडी, काटी, वडाळा, शेळगाव येथील भजनी मंडळासह पंचक्रोषीतील पाच हजार मंडळी उपस्थित होते.
या किर्तन यशस्वीतेसाठी राजाभाऊ टोले, भागवत मंडलिक, गजु गटकळ , दिंगबर देशमूख, दादा चव्हाण, संजय भोसले प्रथम टोले, कृष्णा टोले, प्रसाद गटकळ आदींनी परिश्रम घेतले.
