परंडा / प्रतिनिधी : -
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सण 2019-20 ग्लोबल शाळेतील इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष गोरख मोरजकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य व व ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या सचिव सौ.आशा मोरजकर उपस्थित होत्या. उपस्थित विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचे धडे दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठवरे जी.एस.यांनी केले तसेच आभार प्रदर्शन गायकवाड एस.बी.यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
