उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऑक्टोबर- नोव्हेंबर,२०१९ मध्ये बी.सी.ए तृतीय वर्ष सहाव्या सत्राच्या परीक्षा झाल्या होत्या. सदर विद्यार्थ्यांचा निकाल हा २७ डिसेंबर,२०१९ रोजी लागला होता. वर्ष उलटून गेले तरी विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक महाविद्यालयास उपलब्ध झालेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळत नव्हते. यासंदर्भात बी. सी. ए. च्या विद्यार्थ्यांनी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड. संजय भोरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते.  कारण गुणपत्रक नसल्यामुळे जॉब मिळवण्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी कागदपत्रे दाखल करण्यामध्ये या विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या.

 अॅड.भोरे यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवत तात्काळ विद्यार्थ्यांना गुणपत्रक उपलब्ध करून देण्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांच्याकडे विद्यापीठ उपपरीसर, धाराशिव चे संचालक दत्तात्रय गायकवाड यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मागणी केली होती. विद्यापीठ प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत आठ दिवसांत बी. सी. ए. च्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिले.महाविध्यालयाकडून संबंधित विध्यार्थ्यांना  विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटपही करण्यात आले असल्याचे बील गेट्स काॅलेजचे प्राचार्य रिझवी सर यांनी अॅड.भोरे यांना दुरध्वनीवर सांगितले.

  त्याचबरोबर ऑक्टोबर - नोव्हेंबर,२०१९ मध्ये परीक्षा झालेल्या सी. बी. सी. जी. एस.(८०-२०) पॅटर्नच्या बी. कॉम. च्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही गुणपत्रक लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत अशी देखील मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांचे गुणपत्रक ही उपलब्ध होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे अॅड.भोरे यांनी सांगितले आहे.

 
Top