उस्मानाबाद / प्रतिनिधी-
बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांबरोबरच शैक्षणिक संस्थान समोर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करण्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळेच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या IQAC या विभागाने दि.७ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ऑनलाइन “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर ऑनलाइन वर्कशॉपचे आयोजन केले होते. या वर्कशॉपसाठी संपूर्ण राज्यातून २०९ पेक्षा जास्त प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या वर्कशॉपसाठी प्रमुख वक्ते म्हणून शासकीय एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडचे संचालक डॉ. वाय.व्ही जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ.एस.बी. देवसरकर व ISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणेचे प्राचार्य डॉ पी.बी. माने तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या चर्चासत्रात सध्याच्या शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करून शिक्षण व्यवस्थेत बहुवैविध्य आणि बहुभाषिक करण्यावर भर देण्यात यावा असे प्रतिपादन डॉ.वाय व्ही जोशी यांनी केले. तर या सर्व गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी भरीव आर्थिक तरतुदीची मागणी करण्यात यावी असे प्रतिपादन डॉ. देवसरकर यांनी केले .तसेच मल्टि डिसीप्लिनरी अभ्यासक्रम म्हणजेच वेगवेगळे विषय एकत्रित येणार असल्यामुळे या विषयांचे विभाजन मेजर आणि मायनरमध्ये होईल असेही त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक आणि अन्य कारणामुळे होणारे ड्रॉपआऊट शैक्षणिक धोरणात कमी होतील अशी आशा डॉ. पी.बी. माने यांनी व्यक्त केली. तर संचालक वाय.व्ही. जोशी यांनी हे अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागात असूनही येथे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे, उपक्रमाचे आणि गुणवत्तेच्या बाबतीत महाविद्यालयाचे कौतुक केले. या वर्कशॉपमध्ये बोलताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय ईयंत्र सेल, IPR सेल, CISCO सेल, प्लेसमेंट सेल, IQAC, ICC सेल तसेच indusrty इन्स्टिट्यूट training या माध्यमातून सतत प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक प्रा.डॉ.पवन पाईकराव, प्रा. व्ही.व्ही. नवले, प्रा. प्रतिमा कोकरे, प्रा. एस.एम. पवार यांनी परिश्रम घेतले .प्रमुख वक्त्यांची ओळख प्रा. उषा वडणे यांनी करून दिली तर प्रा. वंदना मैदरगी यांच्या स्वागत गीताने वर्कशॉपची सुरुवात झाली. उपस्थितांचे आभार प्रा. योगिता अजमेरा यांनी मानले.