उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे शाखा उस्मानाबाद, स्वामी विवेकानंद केंद्र व संस्कार भारतीच्या संयुक्त विद्यमाने आकाश कंदील कार्यशाळा संपन्न झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत दीपोत्सवाचे महत्त्व सांगण्यात आले.

कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी बाजारात न जाता आपण स्वतः बनवलेला आकाशकंदील घराच्या बाल्कनीत लावण्याचा आनंद वेगळाच असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्रीपतराव भोसले विद्यालयाचे मुख्याध्यापक शेषनाथ वाघ यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यशाळेत १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या आकाश कंदीलावर ‘मास्क वापरा कोरोना टाळा’ व शुभ दीपावली असा संदेश रेखाटण्यात आला आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी आम्ही तयार केलेले आकाशकंदील लावणार असा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद केंद्रप्रमुख प्रा. श्यामराव दहिटणकर, संस्कार भारतीचे जिल्हा उपप्रमुख अनिल ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 
Top