तुळजापूर / प्रतिनिधी -
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवात होणारा अन्नदानाचा कार्यक्रम यंदा कोरोना महामारी पार्श्वभूमीवर रद्द करुन त्याऐवजी महाप्रसाद म्हणून लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीतुळजाभवानी मंदीर महाद्वारासह शहरातील विविध भागात चौदा पथकाचा माध्यमातून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
हया महाप्रसादाचे वितरण श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक इंतुले , नागेश शितोळे, जयसिंग पाटील, अभियंता भोसले गायकवाड यांच्या उपस्थित करण्यात आले.