तुळजापूर / प्रतिनिधी

 कर्नाटक राज्यातील मराठी बांधवांच्या समर्थनार्थ आणि कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात अाल्या.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार कर्नाटक राज्याची निर्मिती झाली आणि अन्यायाने मराठी भाषिक बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा भाग या राज्याला जोडला गेला. याचा निषेध म्हणून १ नोव्हेंबर या दिवशी सीमावासीय काळा दिवस पाळतात. या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौका नजीक हुतात्मा स्मारकासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी ज्येष्ठ नेते बबन गावडे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, सचिन कदम,शरद जगदाळे,महेश चोपदार,संदीप गंगणे, आपासाहेब पवार,गणेश नन्नवरे,नितीन रोचकरी,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष तौफिक शेख, समर्थ पैलवान, अनमोल शिंदे, आदित्य शेटे, राजू भोरे, इंद्रजित सुरवसे,मयूर झिंगाडे उपस्थित होते.


 
Top