तुळजापूर / प्रतिनिधी - 

श्री तुळजाभवानीच्या अश्विनी पोर्णिमेचा वर्षातील महत्त्वाचा छबिना शनीवारी दि. 31 च्या राञी ११ वाजता संपन्न झाल्यानंतर तुळजाभवानी मातेचे मंहत तुकोजीबुवा त्यांचे शिष्य मंहत वाकोजी बुवा  यांनी देवी मंदीरात आपल्या उपरण्याची झोळी करुन अंबाबाईचा  जोगवा  या नावाने जोगवा मागीतल्या नंतर शारदीय नवराञ उत्सवातील गेली पंधरा दिवस चालु असलेल्या धार्मिक विधीची सांगता झाली.

छबिना संपल्यानंतर देविचे मंहत तुकोजीबुवा शिष्य वाकोजीबुवा यांनी श्री दत्त मंदीरापासून मंदिर प्रांगणात अंबाबाईच्या नावाने आपल्या उपरण्यात जोगवा मागितला. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय पोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे , श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार सौदागर तांदळे, धार्मीक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले,  नागेश शितोळे , किशोर गंगणे,  विशाल रोचकरी, दादा दिक्षित आदी उपस्थित मंडळींनी  पैसे व मीठ-पीठ घालुन जोगवा वाढला त्यानंतर मंहत तुकोजी बुवांचा मठात फोडण्यात आलेल्या नारळाचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. 

देविभक्त परडीत जोगवा मागतात माञ मंहत मंडळी हे उपरण्यात प्रत्येक महिन्याचा पोर्णिमेला छबिना निघाल्यानंतला आपल्या उपरण्याचा झोळीत जोगवा मागतात. 

  किर्तीमुख  वाहन छबिना 

शनीवारी राञी सोलापूरच्या शिवलाड तेली  समाजाच्या मानाचा काठ्या मंदीरात साधेपणाने दाखल झाल्या नंतर त्या छबिन्याच्या अग्रभागी घेवुन संभळाचा कडकडाटात  भाविका विना  छबिना काढण्यात आला.यावेळी मानकरी सेवेकरी मंदीर, कर्मचारी पोलिस कर्मचारी यांनी आई राजा उदो-उदोचा गजर करीत छबिना वाहनावर कुंकवाची उधळण करुन भाविकांची कसर भरुन काढली. त्यानंतर मंदीर संस्थान च्या वतीने  काठ्याचे मानकरी यांचा भेरपहेरावा देवुन  ययोचित सन्मान करण्यात आला.

 
Top