तालुक्यातील दगड धानोरा येथे दिल्ली येथील स्माईल फाउंडेशन यांच्या सहकार्याने दाबका येथील क्रांतिकारी महिला सामाजिक संस्थे च्यावतीने गावातील महिला बचत गटातील महिला सदस्यांना २१० जीवनावश्यक ३५ किलो वजनाचे किट उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सोमवारी (०२) श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात वाटप करण्यात आले.
दिल्ली येथील फाउंडेशनच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यापासून दाबका येथील क्रांतिकारी महिला सामाजिक संस्थेच्या सचिव बालिका इंगळे कोरोना काळात अनेक कुटूंबाचा उदरनिर्वाह थांबल्याने सर्व सामान्य, गोरगरीब व गरजू कामगार कुटुंबाना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे कीट तालुक्यात अनेक गावात वाटप करीत आहेत. सोमवारी दगड धानोरा येथील महिला बचत गटातील २१०महिला सदस्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या किट मध्ये गहू व ज्वारीचे पीठ, तांदूळ, साखर, रवा,चना, खाद्यतेल, साबण, डाळ, मिरची पावडर, हळद पावडर, कांदे व बटाटे, महिलांसाठी मास्कचे वाटप ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिल्याने महिला वर्गातून क्रांतिकारी महिला सामाजिक संस्था सचिव बालिका इंगळे, अध्यक्ष अर्पिताताई इंगळे आणि स्माईल फाउंडेशन संस्थेचे महिलांनी आभार मानले. क्रांतिकारी महिला संस्था अध्यक्ष अर्पिता इंगळे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रथम फाउंडेशन किल्लारीचे प्रतिनिधी प्रा सुमित कोथिंबीरे, सरपंच युवराज व्होनपाके, तुरोरी व्यापारी संघटनेचे शशिकांत ख्याडे, दास जाधव, ऋषीकेत पाटील, उषा जाधव,कविता थिटे, लक्ष्मीबाई जाधव, ठकूबाई बेळंबे, लिंबाबाई भोसले यांनी मनोगतात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. उपक्रमासाठी रितेंद्र इंगळे, अतुल भोसले, गजेंद्र इंगळे, सचिन जमादार आदींनी परिश्रम घेतले. विनीता गायकवाड यांनी सूत्रसंचलन केले. स्माईल फाउंडेशन व क्रांतिकारी महिला सामाजिक संस्थेने जीवनावश्यक वस्तू गावा पर्यंत पोहचवू महिलांना सहकार्य, मदत केल्याबद्दल दास जाधव यांनी आभार मानले.