उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यातील एसटी कामगारांच्या स्थगित वेतनासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यभरात आक्रोश आंदोलन दि.२ नोव्हंेबरपासून सुरू असून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्टच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरीत स्थकित वेतन देण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, थकित वेतनासाठी पुकारलेल्या आक्रोश आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणुन हे आंदोलन करण्यात आले असून राज्य शासनाप्रमाणे या कर्मचाऱ्यांना स्थकीत महागाई भत्ता व उत्सव अग्रीम रक्कम देण्यात यावी, जिल्हयातील सर्व आगारातील एसटी कामगार संघटनेच्या वतीने या मागण्यासाठी तहसीलदारांना निवदने देण्यात आली असून आंदोलनाचा दुसरा टप्पा दि. ९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. 

निवेदन देते समयी संघटनेचे विभागीय सचिव शरद राऊत, जिल्हाध्यक्ष मधुकर अनभुले, कार्याध्यक्ष राजेश काशिद, सी.सी.एसचे चेअरमन सतिश धस, राम माने,बालाजी पाटील, ओमकार कालेकर, शाम जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top