येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालय परंडा व संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे म्हणाले की, सरदार वल्लभाई पटेल यांनी हिंदुस्थानातील ५६५अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे खूप मोठे कार्य त्यांनी केले.त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले आणि म्हणून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस भारतीय एकता दिवस म्हणून घोषित केलेला आहे . त्यांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केले पाहिजे असे त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले.यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ.राहुल देशमुख ,महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बबन ब्रह्मराक्षस, प्रमोद केजकर, संतोष राऊत, दत्ता आतकर ,भागवत दडमल ,वसंत राऊत, श्रीमती सुनंदा कोठुळे, श्रीमती पद्मा शिंदे आधी उपस्थित होते.महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्यावतीने व ग्रंथालयाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.