उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद सुपुत्र तथा देशातील नामांकित धनश्री डेव्हलपर्सचे चेअरमन शंकरराव बोरकर यांनी कोरोना संकट काळात अतुलनीय काम केले असुन स्वतःच्या मालकीचे 1 लाख चौ.स्क्वेअर फुटाचे शॉपिंग मॉल सेंटर कोरोना उपचारासाठी रुग्णालयात रूपांतरीत केली आहे. या रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ठाकरे यांनी बोरकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा,सुविधा व सुसज्ज यंत्रणा असल्याने कोरोना संकटात रुग्णाना मोठा आधार मिळाला आहे.

कट्टर शिवसैनिक व नेते अशी ओळख असलेल्या शंकरराव बोरकर यांनी कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत मुंबईच्या कल्याण येथील स्वतःच्या मालकीचे व स्वतः बांधलेले एक लाख चौ.स्क्वेअर फुटाचे शॉपिंग मॉल सेंटर महाराष्ट्र शासनास तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यास दिले होते, या कोविंड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मा.खासदार कपिल पाटील, महापौर सौ.विनिता पाटील, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोरकर आम्ही आपली कोणतीही आर्थिक हानी होऊ देणार नाहीत अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रसंगी सुनिल पवार अति.आयुक्त कल्याण महानगर पालिका यांनी आभार मानले.

यापूर्वी शंकरराव बोरकर यांनी दुष्काळ,पाणी टंचाईसह नैसर्गिक आप्पती काळात अनेक उपक्रम राबविले असुन त्यांनी तरुणांना उद्योग मार्गदर्शन करीत मुंबई सारख्या शहरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.बोरकर यांचे पुत्र अमोल बोरकर यांनीही मुंबईत शिवसेना शाखाप्रमुख या नात्याने अनेकांना मदतीचा हात दिला आहे.


 
Top