तुळजापूर / प्रतिनिधी-  

तुळजापूर -केशगाव रस्त्यावर असणाऱ्या तुळजापूर खुर्द जवळ असणाऱ्या पुलावरील रोड अतिवृष्टीच्या पावसात वाहुन गेल्याने हा भाग धोकादायक बनला असुन हा रस्ता अपघात घडण्यापुर्वी त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर खुर्द जवळ असणाऱ्या पुलावर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे पुलावरील रस्ता वाहुन गेला असुन रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. माञ याकडे  सार्वजनिक बांधकाम खात्याचा अधिकारी वर्गाचे गेली पंधरा दिवसा पासुन दुर्लक्ष आहे. सध्या या खराब झालेल्या पुलावरुन जीव धोक्यात घालुन वाहने न्यावे लागत आहे तसेच या रस्त्यावर राञी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने राञी हा पुलावर रस्त्यावर  पडलेला खड्डा न दिसल्यास मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारत येत नाही

त्यामुळे जिवीत हानी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते याकडे लक्ष देणार काय असा सवाल संतप्त जनतेतुन होत आहे. अधिकारी वर्गाचे नव्या मालदार कामाकडे अधिक लक्ष असुन जुन्या कामाकडे माञ त्यांचे दुर्लक्ष असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.  उस्मानाबाद -केशगाव- बेंबळी -धारुर या रस्त्यावरून जाण्याचा हा मार्ग आहे. हा रस्ता उस्मानाबाद -तुळजापूर रत्यास पर्याय म्हणून वापरला जात आहे.यावरुन रोज शेकडो वाहने येजा करतात. तरी या पुलावरील वाहुन गेलेल्या रस्ताची तातडीने दुरुस्ती करुन संभाव्य जिवीत हानी थांबविण्याची मागणी होत आहे.

 
Top