कळंब/ प्रतिनीधी
कळंब येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या डॉ .योगिता चौधरी -शिंदे यांनी राष्ट्रीय आयुष्य आयुर्वेद पदव्यूतर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारत देशातून ३० वा तसेच खुल्या प्रवर्गातून १६ वा क्रमांक पटकावला आहे.
आयुर्वेद पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयुष्य ने २८ संप्टेंबरला परीक्षा घेतली होती.त्याचा निकाल जाहीर झाला आहे कळंब येथेच राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत व कोविड केंद्राचे समन्वयक डॉ स्वप्नील गणेश शिंदे यांच्या पत्नी आहेत त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.